breaking-newsमनोरंजन

#Lockdown:सलमानने ५ हजार कुटुबांना दिली ईदी

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरस दरम्यान सतत गरजुंची मदत करताना दिसत आहे. त्यात नुकताच संपूर्ण जगात ईद साजरी करण्यात आली. नेहमी पेक्षा यंदाच्या वर्षाची ईद वेगळी असली तरी सलमानने अनोख्या अंदाजात ईद साजरी केली. ईद या सणाचे औचित्य साधत सलमानने ५ हजार कुटुबांना ईद किटचं वाटप केलं आहे. अशा प्रकारे सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी यंदाची ईद देखील खास केली. 

या संदर्भातील माहिती महाराष्ट्र नेते राहुल एन कानल (Rahul N Kanal) यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली.  त्यांनी आपल्या ट्विटद्वारे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये लोक फूड  किट तयार करताना दिसत आहेत. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. फोटो पोस्ट करत राहुल एन कानल यांनी कॅप्शनमध्ये ‘सलमान तुझे आभार.. ईदच्या मुहूर्तावर  तू तब्बल ५ हजार कुटुंबांमध्ये आनंदाचे  वातावरण निर्माण केले आहे. केवळ आपल्यासारखे लोक समाजात संतुलन राखून ठेवतात.’ लिहिलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button