breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहीदांना पिंपळे सौदागरमध्ये श्रध्दांजली

पिंपरी चिंचवड :-  २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना पिंपळे सौदागरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाउंडेशन, जयनाथ काटे युवा मंच,कुंदाताई भिसे सोशल फाउंडेशन आणि संदिप नखाते युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. 

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. या हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबाळे हे वीरपुत्र देशासाठी शहीद झाले. अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.  

आपण शहीद झालेल्या या वीरपुत्रांची कमी तर भरून काढू शकत नाही परंतु या मेणबत्तीच्या रूपात त्यांची हे बलिदान सदैव देशवासीयांच्या मनात उजागर ठेवू जे आपल्या या येणाऱ्या पिढीतले देशप्रेम कधी विजू देणार नाही असे नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले. तसेच यापुढे दरवर्षी २६ नोव्हेंबर यादिवशी असेच आपण एकत्र येऊन या शहीद वीरपुत्रांना नमन करण्यासाठी जमणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. यावेळी निर्मलाताई कुटे,जयनाथ काटे, कुंदाताई भिसे यांनी तसेच परिसरातील काही जेष्ठ नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना सहकारी बँकेचे व्हॉईस चेअरमन जयनाथ काटे, उन्नती फाउंडेशन  चेअरमन कुंदा भिसे आणि संस्थापक संजय भिसे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते तसेच ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन सदस्य, पिंपळे सौदागर हास्य क्लब सदस्य, नवचैतन्य हास्य क्लब सदस्य, परिसरातील सोसायटी कमिटी पदाधिकारी, महिला आणि लहान मुले यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button