breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: ३१ मार्चपर्यंत तुळजाभवानीचे मंदिर बंद राहणार

तुळजापूर | महाईन्यूज |

कोरोना विषाणूच्या भितीमुळे राज्यातील धार्मिक स्थळं हळूहळू बंद करण्यात येत आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे मंदिर देखील बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत तुळजाभवानीचे मंदिर बंद राहणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. राज्यात कोरोना विषाणू वेगात पसरत आहे. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुळजापूर मंदिर प्रशानाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सर्व विधी पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने दिले आहेत. या काळात भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, राज्यामध्ये कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना विषाणूचे ३७ रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूच्या भितीमुळे भाविकांनी धार्मिक ठिकाणी पाठ फिरवली आहे. सर्वच धार्मिक स्थळं ओस पडू लागली आहेत. अशातच मंदिर प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता केली जात आहे. तर काही मंदिर बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button