breaking-newsव्यापार

#Lockdown:लॉकडाऊनमुळे MARURTI SUZUKIला फटका

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा फटका ऑटो सेक्टरला बसला आहे. लॉकडाऊनमुळे ऑटो सेक्टरचं मोठं नुकसान झालं आहे. पण कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यवसाय सुरु केला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुतीनेही 12 मेपासून काम सुरु केलं आहे. पण मारुती सुझुकी इंडियाला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या मे महिन्याच्या विक्रीमध्ये 86 टक्के घसरणीची नोंद झाली आहे. मेमध्ये मारुती सुझुकीने 18,539 यूनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने 1,34,641 यूनिट्सची विक्री केली होती.

कंपनीने गेल्या महिन्यात 4651 वाहनांची निर्यात केली होती. तर मे 2019 च्या तुलनेत ही विक्री 48.82 टक्के कमी आहे. कंपनीने 12 मेपासून मानेसरमध्ये तर 18 मेपासून गुडगावमध्ये, सरकारी नियमाचं पालन करत वाहन निर्मितीचं काम सुरु केलं. 25 मेपासून गुजरातमध्ये प्रोडक्शन सुरु करण्यात आलं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाईन्सनुसार, शहरांतील विविध शोरुमही टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत.

भारतात एप्रिल महिन्यात एकाही कारची विक्री नाही

देशातील अनेक कंपन्या ऑनलाईनच कारची विक्री करत आहेत. ज्या लोकांना मारुती सुझुकीची कार खरेदी करायची आहे, त्यांना लोक कंपनीच्या वेबसाईटवरुन कार बुक करता येऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरच खरेदीचे आवश्यक कागदपत्र जमा करता येणार आहेत. त्यानंतर कंपनी जवळच्या डीलरशीपकडून कार घरपोच करण्यात येईल. कार घरी पोहचवण्यावेळी कारच्या सॅनिटायझेशनची काळजी घेण्यात येत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button