breaking-newsआंतरराष्टीय

वर्णद्वेषावरून अमेरिकेत भडका

वॉशिंग्टन : वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसा भडकण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरुन उडालेला हा भडका आता थेट अमेरिकेची सूत्र हातळल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊसपर्यंत येऊन पोहोचला आहे. जवळपास ३० हून अधिक शहरांमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्याच बंकरमध्ये लपण्याची वेळ आली. 

आंदोलकांची हिंसक कृत्यं सुरु असतानाच यामध्ये व्हाईट हाऊसच्या परिसरात असणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हे सर्व चित्र पाहता सिक्रेट सर्व्हिस एजंटनं सुरक्षेच्या कारणस्तव ट्रम्प यांना बंकरमध्ये नेलं. जवळपास अर्ध्या तासासाठी डोनाल्ड ट्रम्प हे बंकरमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, अमेरिकेत बहुतांश भागांमध्ये संचारबंदीचे निर्देश असतानाही व्हाईट हाऊस परिसरात सुरु असणाऱी आंदोलनं मात्र शमली नाहीत. यावेळी आंदोलकांडून जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला गेला. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत ट्रम्प सरकारविरोधातील वातावरण आणखी बळावलं आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच आता वर्णभेदावरुन सुरु असणारी एकंदर हिंसा पाहता ट्रम्पविरोधी वातावरणात भर पडू लागली आहे. परिणामी आगामी निवडणुकाांच्या दृष्टीनेही ट्रम्प यांच्यापुढे बऱ्याच अडचणी उभ्या असल्याचं चिन्हं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button