breaking-newsव्यापार

#Lockdown:लॉकडाऊनमध्ये शंभर कोटींचा ऑनलाईन व्यवहार

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने अनेकजण ऑनलाईनद्वारे वस्तू मागवत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात देशात एकूण शंभर कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिली.

लॉकडाऊनमध्ये अनेकजण मोबाईल रिचार्ज, टेलिफोन, वीजबिल, औषध आणि अन्नधान्य खरेदी यांचे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून जोरदार खरेदी केली आहे.

ऑनलाईनच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल 2020 मध्ये तब्बल 99 कोटी 90 लाख ऑनलाईन व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे. या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहितीही नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडियाने दिली.

कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होईल या भीतीनेही नागरिक पेट्रोल पंप, बाजारातील दुकानात ऑनलाईन पेमेंट करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button