खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा, माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिकांचा संताप
सोलापूर|महाईन्यूज|
‘हा’ खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा, अशा संप्तत भावना सोलापूरात शिवसैनिक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे यांच्याकडे शिवसैनिक मागणी केली आहे. या बॅनरवर मात्र कोणी निष्ठावंत शिवसैनिक असा उल्लेख असल्याने नेमके पोस्टर्स कोणी लावले याची स्पष्टता नाही.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत थेट भाजपाला मदत केली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. मात्र तानाजी सावंत यांच्या पक्षविरोधी कृत्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सोलापूरातील मेकॅनिक चौकात हा बॅनर लागलेला आहे. यामध्ये तानाजी सावंत यांचा फोटो खेकड्याच्या चित्रावर टाकण्यात आला आहे. सोलापूर आणि धाराशीवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा असं लिहिण्यात आले आहे. तानाजी सावंत मंत्री असताना कोकणातील तिवरे धरण फुटण्याची घटना घडली होती. त्यावेळी खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटले असा अजब दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच मी महाराष्ट्राला भिकेला लावेल, पण मी कधीही भिकारी होणार नाही असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावरुनही विरोधकांनी मोठी कोंडी केली होती.