breaking-newsपुणे

#Lockdown:घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगी

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारने नुकतंच लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर आता पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरासाठी लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्यात परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलासा दिला आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरकाम करणाऱ्या महिलांना ही परवानगी देण्यात आली. मात्र केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरील महिलांना ही परवानगी आहे. तसेच सोसायटीला कोरोना संदर्भात योग्य त्या दक्षतेच्या उपायोजना राबवणं बंधनकारक आहे, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button