breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Alandi : पोलिसांना तुडवत वारकरी..; आळंदीमधील घटनेची दुसरी बाजू पाहाच..

पुणे : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानावेळी मंदिराच्या बाहेर काही वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जच केल्याची घटना घडली आहे. मारहाण झालेल्या एका वारकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, दरम्यान आता या ठिकाणचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाही.

आळंदीमधील आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आळंदी येथे घडलेल्या प्रकरणाची ही दुसरी बाजू असल्याचं अनेक जण म्हणत आहे. यामध्ये पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरूण वारकरी हे नियम डावलून पोलिसांना धक्काबुक्की करत आहे. पोलिसांना मागे ढकलत आणि त्यानंतर पोलीसांच्या अंगावरून मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – WTC 2023 Prize Money : ऑस्ट्रेलिया संघावर पैशांचा पाऊस! फायनल हारूनही भारताला मिळाले ‘इतके’ कोटी

पाहा व्हिडीओ –

https://twitter.com/deshdoot/status/1668189734898630661

माऊलींच्या मंदिरात जाण्यासाठी काही तरूण प्रयत्न करत होते. त्यांना अडवत पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाली, असं पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button