breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

Cowin पोर्टलवरून डेटा लीक? केंद्र सरकार चौकशी करणार

Cowin : कोविड लसीकरण पोर्टल कोविनवरून डोटा लीक झाल्याची माहिती मिळत आहे. टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि पासपोर्टचा तपशील लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसला मिळाली आहे.

जेव्हा कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टेलिग्राम बॉटवर टाकला जातो, तेव्हा लिंग, डीओबी आणि लसीकरण केंद्राचे नाव आणि त्याचा डोस यासह लसीकरणासाठी वापरलेला ओळखपत्र क्रमांक उघड होतो. या डेटा ब्रीचमुळे टेलिग्रामवर प्रत्येकासाठी भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट क्रमांक उपलब्ध असल्याचं दिसतंय. जेव्हा लसीचे डोस उपलब्ध होते, तेव्हा लोक एकाच मोबाइल नंबरसह अनेक कुटुंबातील सदस्यांसाठी स्लॉट बुक करायचे.

हेही वाचा – Alandi : पोलिसांना तुडवत वारकरी..; आळंदीमधील घटनेची दुसरी बाजू पाहाच..

मिळाल्या माहितीनुसार, अनेक लोकांनी एकाच नंबरवर नोंदणी केली असेल, तर टेलिग्राम बॉट त्या सर्वांची माहिती एकाच वेळी दाखवत आहे. आम्ही या समस्येची दखल घेतली आहे आणि मूळ कारणाचा तपास सुरू केला आहे आणि डेटा Cowin किंवा इतर कुठूनही लीक झाला आहे की नाही याची चौकशी सुरू केली आहे, असं इलेक्टॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या एखा वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button