ताज्या घडामोडीमुंबई

आम्ही ठाकरे सिनेमाही टॅक्स फ्री केला नव्हता; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

मुंबई | दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही ठाकरे सिनेमाही टॅक्स फ्री केला नव्हता, असं संजय राऊत म्हणाले.

बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी केली होती. त्यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून दिली. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनीही काश्मीर फाइलवरून भाजपला घेरले आहे.

सिनेमा करमुक्त च्यामसंजय राऊत म्हणाले की, आता त्यांना काश्मीर आठवले आहे. मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये. आम्ही ठाकरे चित्रपट बनवला. मात्र, तो सुद्धा टॅक्स फ्री केला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button