breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC 2023 Prize Money : ऑस्ट्रेलिया संघावर पैशांचा पाऊस! फायनल हारूनही भारताला मिळाले ‘इतके’ कोटी

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याचा इतिहास रचला आहे. या सामन्यात भारतीय संघाला २०९ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचं चॅम्पियन बनण्याच स्वप्न मोडीस निघालं. टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सलग दुसऱ्या सत्रात पराभव झाला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर सर्वच संघांवर पैशांचा पाऊस पडला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. पराभूत झालेल्या टीम इंडियालाही बक्षिसाची चांगली रक्कम मिळाली आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या बक्षिसांच्या रकमेत मोठी तफावत आहे.

हेही वाचा – वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खास आवाहन, म्हणाले..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघाला म्हणजेच ऑस्ट्रेलियन संघाला १३.२ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच उपविजेत्या टीमला म्हणजेच टीम इंडियाला पराभूत होऊनही ६.५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३ कोटी ७२ लाख रुपये मिळाले आहेत.

या आवृत्तीत इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. अशा स्थितीत इंग्लडच्या संघाला बक्षीस म्हणून २ कोटी ८९ लाख रुपये मिळाले आहेत. तर पाचव्या स्थानी असलेल्या श्रीलंकेच्या संघाला १.६५ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही चांगली रक्कम मिळाली आहे. अशा प्रकारे प्रत्येक संघाच्या खात्यात काही ना काही बक्षिसाची रक्कम आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button