breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा मोठा निर्णय; ऐनवेळी बदलला नागपुरमधील उमेदवार!

नागपूर |

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला असून, आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तसं पत्रक देखील काढल आहे. तर, विधानपरिषदेचे अगोदरचे उमेदवार भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

काँग्रेसकडून उमेदवार बदलला जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यानंतर काँग्रेसने आता प्रत्यक्ष तसा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. तर, काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर छोटू भोयर यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली. विदर्भातील अकोला व नागपूर या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सामना रंगत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button