breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विनामास्क फिरणारा तोतया एसीपी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी |महाईन्यूज|

चारचाकी वाहनातून विनामास्क फिरत असल्याने वाहतूक पोलिसांनी चाैकशी केली. त्यावेळी बनावट ओळखपत्र दाखवून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे सांगितले. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याची तोतयेगिरी उघडकीस आली. जाधव सरकार चाैक, स्पाईन रोड, चिखली येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी हा प्रकार घडला.

प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय ३३, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा), असे आरोपीचे नाव आहे. निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुनील शिवाजी गायकवाड (वय ४०) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी जाधव सरकार चौकात वाहतूक नियमन तसेच विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनातील दोघांनी मास्कचा वापर केला नसल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी चारचाकी वाहन थांबवून कारवाई करण्यास सुरवात केली. त्यावेळी चारचाकी वाहनात आरोपी सूर्यवंशी होता. मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर (एसीपी) मी कार्यरत आहे, अशी बतावणी आरोपी सूर्यवंशी याने केली. तसेच फिर्यादी यांना त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले.

दरम्यान, तोतया एसीपीचा भांडाफोड केल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे, उपनिरीक्षक एस. एस. राऊत, पोलीस कर्मचारी सुनील गायकवाड, कुर्मदास दहिफळे, लक्ष्मण कोल्हे, शंकर कशाळे यांचा विशेष सत्कार केला. तसेच त्यांच्या पथकाला बक्षीस जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button