TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र धारावीत सुरू

मुंबई | पालिकेने मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारले असून या सुविधा केंद्राचे लोकार्पण बुधवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या केंद्रामध्ये तब्बल १११ शौचकुपांसह आठ स्नानगृहे आणि कपडे धुण्यासाठी १० मोठय़ा आकाराची यंत्रे आहेत. या सुविधा केंद्राची उभारणी हिंदूस्तान युनिलिव्हर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून करण्यात आली आहे. या सुविधा केंद्राचा परिसरातील सुमारे पाच हजार व्यक्तींना लाभ होणार आहे.

मुंबईकरांना स्वच्छतेच्या विविध सोयी-सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने मुंबईत विविध ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्रे उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा केंद्रे विविध कंपन्यांच्या व संस्थांच्या सहकार्याने उभारण्यात येत आहेत. ही सुविधा केंद्रे अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने उभारण्यात येत असून सौर ऊर्जेचा वापर, वापरलेल्या पाण्याचे चक्रीकरण करून पुन्हा वापर करण्यात येत असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि मे. युनायटेड वे मुंबई, मे. हिंदूस्थान युनिलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून, सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत जी उत्तर विभागातील धारावी पंपिंग परिसरात दुमजली सार्वजनिक सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

मुंबईत दहा ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत मुंबईत विविध १० ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित संस्थांमध्ये बुधवारच्या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार धारावीत प्रेम नगर, काळा किल्ला, घाटकोपरमध्ये भीम नगर, साईनाथ नगर, गोवंडीमध्ये टाटा नगर, तानाजी मालुसरे मार्ग, चेंबूरमध्ये गायकवाड नगर, सांताक्रूज (पूर्व)मध्ये दावरी नगर, कुचिकोरवे नगर, खेरवाडी या ठिकाणी ही सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

वैशिष्टय़े काय? सुविधा केंद्रात तब्बल १११ शौचकुपे असून ते देशातील सर्वात मोठे सामुदायिक सुविधा केंद्र ठरले आहे. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था आहे. तसेच लहान मुले आणि अपंगांकरिता व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या केंद्रामध्ये परिसरातील नागरिकांकरिता या सुविधा सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.वॉटर सिस्टीम, गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल, कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र, तसेच याद्वारे तयार होणारे सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याचे पुनर्चक्रीकरण करणारा प्रकल्प अशा अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. या शौचालयामुळे धारावी उदंचन केंद्राच्या आसपासच्या परिसरातील नाईक नगर, संग्राम नगर, शताब्दी नगर इत्यादी ठिकाणच्या पाच हजार नागरिकांची सोय होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button