breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

“पाकिस्तान फक्त एकाच नावाला घाबरला होता तो म्हणजे बाळासाहेब”; एकनाथ शिंदे

मी शेतकऱ्याचा मुलगा पण बाळासाहेब ठाकरेंमुळे मी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री झालो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधान भवनाच्या सेंट्रेल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. त्यावेळी पाकिस्तानदेखील कुठल्याही नेता, राष्ट्रपती, पंतप्रधानांना घाबरत नव्हता तो फक्त एकाच नावाला घाबरला होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हिमालयाएवढा नेता बाळासाहेब ठाकरे. पाकिस्तानदेखील कुठल्याही नेता, राष्ट्रपती, पंतप्रधानांना घाबरत नव्हता. फक्त एकाच नावाला घाबरला होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांमुळे ठाण्यात पंचवीस वर्षांपासून आपलीच सत्ता आहे. बाळासाहेबांनी धाडस दिले ते पुढे घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेबांनी अन्यायाविरोधात ताकद, लढण्याचे विचार त्यांनी दिले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी शेतकऱ्याचा मुलगा पण मी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री झालो ही जादू बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. त्यांच्या विचाराने प्रत्येकाला ताकद, ऊर्जा येते. अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढा ही बाळासाहेबांची शिकवण. त्यांच्याबद्दल कंठही दाटून येतो, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबईतला जसा महासागर आहे त्या महासागरासारखे बाळासाहेब ठाकरे होते. प्रसंगी शांत, पण आवश्यक असेल तेव्हा तुफानापेक्षा जास्त असा संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातल्या आणि नेत्यांच्या मांदियाळीतले आपलं वेगळेपण जपणारे नेते होते. बाळासाहेबांचं तैलचित्र आज या ठिकाणी लागतं आहे. मात्र हयात असताना या सभागृहात येण्याचा विचार त्यांनी कधीही केला नाही. त्यांनी मनात आणलं असतं तर ते मुख्यमंत्रीही होऊ शकले असते. मात्र त्यांनी तसं केलं नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सोबतच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनाच्या सेंट्रेल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सर्व सद्स्य उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button