breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? छगन भुजबळांचा हल्लाबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटच्या बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट केला. दरम्यान, यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मात्र, जसजसे भाषणं होतील तसतसे बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. आज ४० पेक्षा अधिक आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. काही वाहतूक कोंडीत अडकले, काही परदेशात अडकले, तर कुणी आजारी आहे. या सगळ्यांनी प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या.

हेही वाचा – ‘..तेव्हा राजकारणात आपोआप बदल होईल’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

लोक सातत्लयाने विचारतात की, तुमच्यावर कारवाई होईल. शरद पवारांनंतर मीही शिवसेना पक्ष निर्माण झाला तेव्हापासून ५७-५८ वर्षे काम करतो आहे. मंचावर बसलेले नेतेही ज्येष्ठ आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदे आम्हालाही कळतात. त्यामुळे जे लोक सांगतात की, ही कारवाई होईल, ती कारवाई होईल त्यांनी लक्षात घ्यावं की या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही पुढचं पाऊल टाकलं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

गेल्या अनेक दिवसापासून आम्ही राज्यातील काही नेत्यांच्या नेमणुका करायला सांगत होतो. अजित पवार यांनी देखील याबाबत भाष्य केलं होतं. मुंबईला अजूनही अध्यक्ष पद नाही. महिला अध्यक्षा नाही. आम्ही सांगून सांगून दमलो तरी नेमणुका झाल्या नाहीत. आज आमच्याकडे ४० पेक्षा आमदार पाठिंबा आहे. तसेच आम्हाला देखील कायदा समजतो. त्यामुळे कुणी काहीही सांगो, आमचं काम आम्ही करीत राहू. तसेच २०१९ ला काय झालं ते सर्वांना माहिती झालं. परंतु गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button