ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

व्हाट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकत्र

सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात

सोलापूर : वर्गमित्राच्या निधनानंतर त्यांच्या आईला वर्गमित्र या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या आवाहनातून जमा झालेली 32 हजार रुपयाची मदत मित्रांनी मयत मित्रांच्या आईच्या हातात सोपवत तिला आधार देताना आईचे डोळे पाणवले.

शहरातील इंग्लिश स्कूलमध्ये 1998 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी दहावीच्या निकालानंतर विखुरले गेले. मात्र व्हाट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते एकत्र आले आणि 27 वर्षानंतरही दररोज एकमेकांचे सुख आणि दुख बरोबर कौटुंबिक, वैयक्तिक उत्सवाच्या निमित्ताने संवाद साधू लागले. त्यातच छायाचित्रकार असलेल्या श्याम डांगे या 42 वर्षीय वर्गमित्राचे नुकतेच अकाली निधन झाले त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते.

हेही वाचा    : सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नकोच; शरद पवार

भावाचे जेमतेम उत्पन्न आहे अशात त्याची आई मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत आहे. कर्त्या मुलाच्या मृत्यूने आधारहीन झालेल्या आईला आधार देण्याच्या दृष्टीने वर्गमित्र 1998 या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केल्यानंतर दहावीत एकत्र शिकलेल्या जवळपास 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी जमेल. त्या पद्धतीने मदत गोळा करत 32 हजार रुपयाची मदत जमा झाली ती जमा झालेली मदत दिनांक 15 जून रोजी मित्रांनी त्याच्या आईच्या हातात लिहून दिले व आम्ही तुमच्या मुलाबरोबर शिकण्यासाठी एकत्र होतो असे सांगताच आईचे डोळे पाणावले.

ग्रामपंचायतीसमोर ठिय्या
मदतीचा हात दिल्यानंतर भविष्यातही काही आर्थिक,आरोग्य विषयक समस्या असेल तर कधीही हाक मारा आम्ही मदत करावयास तयार आहोत असा दिलासादायक शब्द देत वर्ग मित्राने आधार दिला. एका बाजूने सोशल मीडिया सारखे प्लॅटफॉर्मचा वापर चुकीच्या पद्धतीने करून जातीय तेढ वाढवण्याचे प्रकार घडत असतानाच येथे दहावीतील शिक्षणानंतर दुरावल्यानंतर 27 वर्षानंतरही सोशल मीडिया सारख्या ग्रुपचा विधायक उपक्रमातून आईला आधार देण्यासाठी राबवलेला उपक्रम कौतुकास्पद ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button