आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

शाळेत खिचडीतून ४० मुलांना विषबाधा; ठेकेदारांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकसआहार म्हणून दिली जाते खिचडी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकसआहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होते. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते.

या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली. त्यात पाल असल्याचे आढळून आले आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या 40 पोरांना याचा हळूहळू त्रास जाणवू लागला.

याची तात्काळ सूचना ही महापालिकेच्या अधिकाऱ्याने देण्यात आली व महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली. अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत आहे. परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे.

गेल्या दोन महिन्यात दिवा विभागात अनेक घटना घडल्या आहेत. साबेगावातअशीच घटना घडली होती. बी. आर. नगरमध्ये पण अशाच प्रकारच्या घटना या वारंवार विभागात घडत आहेत. तरी तातडीने या खिचडी देणाऱ्या ठेकेदार काते मॅडम यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button