टाटा ग्रुपच्या ताफ्यातून एक कंपनी कमी, टाटा ग्रुपला का विकावी लागली कंपनी?
टाटा कंपनी आता विदेशी कंपनीच्या हातात

राष्ट्रीय : टाटा ग्रुपच्या ताफ्यातून एक कंपनी कमी झाली आहे. टाटा कम्युनिकेशन्सचे स्वामित्व असलेली सब्सिडियरी कंपनी टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सॉल्यूशंस लिमिटेड (TCPSL) मधील शंभर टक्के भागेदारी विकली आहे. आता ही कंपनी विदेशी कंपनीच्या हातात गेली आहे. ऑस्ट्रेलियातील फर्म या कंपनीची भारतीय शाखा पाहणार आहे. टाटांच्या या सहायक कंपनीला ऑस्ट्रेलियातील डिजिटल पेमेंट आणि फायनेंशियल सव्हिसेज कंपनी फिंदी (Findi ) च्या भारतीय शाखा ट्रांजॅक्शन सॉल्यूशन्स इंटरनॅशनल प्राइव्हेट लिमिटेडने घेतले आहे.
टाटा आणि ऑस्ट्रेलियातील कंपनीने टाटा कम्युनिकेशन्स आणि Findi यांनी या करारासंदर्भात संयुक्त पत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व नियमांचे पालन करत दोन्ही कंपन्यांमध्ये 28 फेबुवारी 2025 रोजी करार पूर्ण झाला.
टाटा ग्रुपने का विकली कंपनी?
टाटाची कंपनी टाटा कम्युनिकेशन्सला आता नेटवर्क, क्लाउड, सायबर सिक्योरिटी आणि मीडिया सर्व्हिसेजसारख्या मुख्य व्यवसायावर फोकस करायचे आहे. या सेक्टर्समध्ये चांगली ग्रोथ असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच या क्षेत्रात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे टाटा कम्युनिकेन्सने ही कंपनी विकली आहे. टाटा कम्युनिकेशन्सचे सीएफओ कबीर अहमद शाकीर यांनी सांगितले की, ‘आमचा व्यवसाय खूप मजबूत करण्यासाठी ही डील करण्यात आली आहे. आम्ही अशा क्षेत्रात गुंतवणूक करु इच्छितो, ज्यात भविष्यात जास्त शक्यता दिसणार आहे.
हेही वाचा – गावठाण क्षेत्रांचा होणार विस्तार बावनकुळे यांची माहिती
ऑस्ट्रेलियातील कंपनीने का गेली गुंतवणूक?
ऑस्ट्रेलियातील कंपनीला ही डील एखादा जॅकपॉटसारखी आहे. या अधिग्रहणानंतर फिंदीला 4600 जास्त ATM चे नेटवर्क मिळणार आहे. तसेच व्हाइट लॅबल एटीएम प्लॅटफॉर्म आणि पेमेंट स्विच यासारखी टेक्नोलॉजीचा एक्सेस मिळणार आहे. या डीलमुळे फिंदीला 1.8 लाखपेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये ATM लावण्यात येणार आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ दीपक वर्मा यांनी म्हटले की, ज्या लोकांपर्यंत बँकींग सुविधा नाही, त्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ही डील आम्हाला फायदेशीर ठरणार आहे.