Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

पाकिस्तानमध्ये प्रवासी ट्रेनवर आत्मघातकी बॉम्ब हल्ला; २३ जणांचा मृत्यू, ४७ जखमी

Pakistan Quetta Railway Blast | पाकिस्तानच्या बंडखोरीग्रस्त बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहरात एक अत्यंत भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. क्वेट्टा येथील चमन फाटकजवळ छावणीकडे (कॅन्ट) जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनवर आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्यात आला. या भीषण स्फोटात किमान २३ जणांचा मृत्यू झाला असून ४७ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, ट्रेनचे डबे रुळावरून घसरले आणि घटनास्थळी मोठी आग लागली.

बंदी घातलेल्या ‘बलुच लिबरेशन आर्मी’ (BLA) या दहशतवादी संघटनेने या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या हातून बीएलएच्या दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर आणि त्यांना सततचे धक्के बसल्यानंतर, त्याचा बदला म्हणून हे कृत्य केल्याचे बीएलएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भीषण स्फोट आणि गोळीबार

प्राथमिक अहवालानुसार, स्फोट झाला त्याच वेळी घटनास्थळी गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. ‘सीएनएन-न्यूज१८’ ने जारी केलेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये बचावकार्यादरम्यान घटनास्थळी भीषण आग लागलेली आणि धुराचे प्रचंड लोट निघताना दिसत आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘एआरवाय न्यूज’ ने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हा स्फोट चमन फाटकजवळ झाला. स्फोटानंतर रेल्वे ट्रॅकजवळ लागलेल्या भीषण आगीमुळे स्थानिक नागरिक, आपत्कालीन पथके आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

हेही वाचा

‘कान्स’च्या समारोपाच्या दिवशी ऐश्वर्या रायचा जलवा!

परिसराचे मोठे नुकसान; लष्कराचा वेढा

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटाच्या तीव्र धक्कामुळे आजूबाजूच्या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. जवळील अनेक इमारतींच्या खिडक्या आणि काचा फुटल्या आहेत. तसेच रेल्वे लाईनजवळ असलेली अनेक घरे आणि वाहनांचेही या स्फोटात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आणि रुग्णवाहिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लष्कर आणि सुरक्षा दलांनी सध्या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button