‘‘साहेब गेले; पण जनतेने गड राखला’’: आमदार अश्विनी जगताप
पिंपरी: दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभेत केलेल्या विकासकामाच्यामुळेच आज जनतेने भरभरून मतदान दिले आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याचा देखील फायदा झाला आहे. त्यामुळे नक्कीच तीस हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास अश्विनी जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अमर रहे अमर रहे लक्ष्मण जगताप अमर रहे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि जनतेला समर्पित करते. तसेच पक्ष नेतृत्वाने सूचना केल्यानंतर आपण अधिवेशनाला जाणार आहोत. आपण सर्वसामान्यांची आमदार म्हणून काम करणार असल्याचंही जगताप यांनी सांगितलं. ‘‘साहेब गेले असले तरी गड राखायचा होता. जनतेने गड राखला आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभेत केलेल्या विकासकामाच्यामुळेच आज जनतेने भरभरून मतदान दिले आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याचा देखील फायदा झाला आहे. आजुन आमचा बालेकिल्ला असलेला पिंपळे गुरव सांगवी नवी सांगवी भागातील मतदान मोजणे बाकी आहे. त्यामुळे नक्कीच तीस हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास अश्विनी जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सध्या त्या थेरगाव येथील कामगार भवन येथे सुरू असलेल्या मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आहेत.





