भारताची अत्याधुनिक स्वदेशी तोफेच्या प्रेमात जगातील बलाढ्य राष्ट्र अमेरिका
तोफ खरेदीसाठी अमेरिकन कंपनी एएम जनरल मोटर्सने भारत फोर्ज लिमिटेडसोबत करार

राष्ट्रीय : भारत अमेरिकेकडून आतापर्यंत शस्त्र खरेदी करत आला आहे. परंतु अमेरिका भारताकडून शस्त्र खरेदी करणार? असे म्हटल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. भारताची अत्याधुनिक स्वदेशी तोफेच्या प्रेमात जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र अमेरिका पडला आहे. भारताची आधुनिक तोफ खरेदी करण्यासाठी अमेरिकन कंपनी एएम जनरल मोटर्सने भारत फोर्ज लिमिटेडसोबत करार केला आहे. भारत फोर्जची सहायक कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड (KSSL) सोबत करारावर अमेरिकन कंपनीने हस्ताक्षर केले. या करारानुसार भारतात निर्मिती या प्रगत तोफेची खरेदी अमेरिका करणार आहे. प्रथमच अमेरिका भारताकडून तोफेची खरेदी करणार आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्रानंतर दुसरा करार
आबुधाबीमध्ये आयोजित IDEX 2025 संरक्षण प्रदर्शनात हा करार झाला. एएम जनरल जगातील प्रमुख सैन्य वाहन निर्मिती कंपनी आहे. कधीकाळी शस्त्रांची आयात करणारा भारत आता शस्त्रांची निर्यात करु लागला आहे. भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र यापूर्वी फिलिपिन्सला विकले आहे. आता अमेरिकन कंपनीसोबत झालेला करार म्हणजे संरक्षण क्षेत्रात भारताचा दबदबा वाढत असल्याचे सिद्ध होत आहे.
हेही वाचा – बोपदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांची सुरक्षा ‘बळकट’, राज्य सरकारकडून ८० कोटींचा निधी मंजूर
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड (KSSL) भारतात निर्मिती होणारे 105 एमएस आणि 155 एमएस कॅलिबरचे माउंटेड, टोव्ह आणि अल्ट्रा-लाइट गन सिस्टमची विक्री एएम जनरलला करणार आहे. केएसएसएल स्वदेशी शस्त्र प्रणाली, ऑफ-रोड प्रोटेक्टेड मोबिलिटी सॉल्यूशन्स आणि उच्च-तंत्रज्ञ उत्पादन डिजाइन आणि विकासात काम करते.
भारतीय तोफ घातक
फोर्जच्या तोफा पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्रायव्ह सिस्टमवर चालतात. ही प्रणाली तोफांना विश्वनीय बनवते. तसेच खूप जास्त घातक बनवले. तोफाचे डिझाइन यापद्धतीने केले आहे की त्याच्या देखभाल खर्च खूप होणार आहे. त्यामुळे सर्वात चांगली तोफ ही झाली. हा करार भारत अन् अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या सहकार्याचे संदेश देणारे आहे.
करारानंतर भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, आमच्या तांत्रिक क्षमतेचा पुरावा आहे. तोफखाना सोल्यूशनमध्ये जागतिक नेता बनण्याच्या आमच्या ध्येयाकडे एक मोठे पाऊल आहे. हा करार एएम जनरल सारख्या आघाडीच्या जागतिक संरक्षण कंपन्यांमधील आमच्या क्षमतांवरील विश्वास दर्शवतो.