‘तैवान चीनशी जोडला जाईल’; शी जिनपिंग यांचा अमेरिकेला इशारा

Shi Jinping vs Joe Biden : तैवान प्रकरणावरून चीनने पुन्हा अमेरिकेला इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत तैवान मुख्य भूप्रदेश चीनशी जोडला जाईल, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे. ते सॅन फ्रन्सिस्कोमध्ये झालेल्या शिखर परिषदेत बोलत होते.
सॅन फ्रान्सिस्कोच्या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत एका गटाच्या बैठकीत शी यांनी बायडेनला इशारा दिला. तैवानला चीनमध्ये शांततेत समावेश करून घ्यायचं आहे. आम्हाला कोणतीही बळजबरी करायची नाही, असं चीनने म्हटलं आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी; सभागृहात हशा!
चीन २०२५ किंवा २०२७ पर्यंत तैवानवर कब्जा मिळवेल असं अमेरिकेने भाकित केलं होतं. त्यावरूनही चीनने अमेरिकेला सुनावलं आहे. अमेरिकेने जाहीर केलेली ही तारीख चुकीची असून तैवानवर कब्जा मिळवण्याबाबत अद्याप वेळ निश्चित झाली नसल्याचं जिनपिंग यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत चीनचे तैवानबाबतचे वर्तन अधिक आक्रमक होत जातंय. त्यामुळे जिनपिंग यांच्या या इशाऱ्याचा अमेरिका गांभीर्याने विचार करत आहे. तसंच, चीनने अमेरिकेला इशारा दिल्याचं समोर येताच RS.C.सेन लिंडसे ग्रॅहम यांनी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सना चीनला रोखण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करणारे निवेदन जारी केले.





