Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली

'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे

दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक वळण आले आहे. टीआरएफ (द रेझिस्टंट फोर्स) या दहशतवादी संघटनेने अधिकृतपणे या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, टीआरएफ ही कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची एक ‘फ्रंट ऑर्गनायझेशन’ म्हणून काम करते. यामुळे दिल्लीतील स्फोट थेट काश्मीर-आधारित दहशतवादी कारवायांशी जोडला गेला आहे.

टीआरएफने स्फोटाची जबाबदारी स्वीकारताना हा हल्ला काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे संकेत दिले आहेत. यातून टीआरएफने आपल्या कारवाया केवळ काश्मीरपुरत्या मर्यादित नसून, देशाच्या मुख्य भूभागापर्यंत घुसण्याचा कट रचला आहे.

हेही वाचा –  स्वच्छ सुंदर सातारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार जिल्हा परिषदेतर्फे अभिनव उपक्रम; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची संकल्पना

एका बाजूला तपास यंत्रणा स्फोटातील ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूल आणि अल फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या नेटवर्कचा तपास करत असतानाच, आता टीआरएफच्या या दाव्यामुळे संपूर्ण कट आणि त्याचा विस्तार अधिक व्यापक झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था आता या दाव्याची सत्यता पडताळून पाहत असून, ‘व्हाईट-कॉलर’ नेटवर्कचा टीआरएफ/लश्करशी थेट संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. टीआरएफच्या दाव्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे, कारण हा गट काश्मीरमध्येही सक्रिय असून आता त्याने थेट दिल्ली, हरियाणा, राजस्थान या भागात उपस्थिती लावल्याने मोठे आव्हान उभे केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button