ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

राजनगर झोपडपट्टीवर पुन्हा बुलडोझर, ५० झोपड्यांवर कारवाई

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

नागपूर : शहरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मनपाने गुरुवारी(ता.२४) पुन्हा राजनगर झोपडपट्टीवर बुलडोझर चालवून कारवाईत ५० अनाधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

मागील आठवड्यात बुधवार १६ एप्रिलला या झोपड्यांवर कारवाई झाली होती. त्यावेळी अर्धवट सोडलेली कारवाई आज पूर्ण करण्यात आली. मनपाच्या प्रवर्तन विभागाद्वारे ५० झोपड्या पाडण्यात आल्या.

मंगळवार २२ एप्रिल रोजी येथील रहिवाशांना पुन्हा नोटीस बजावली होती. यानुसार महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील भागात असलेले मुख्य प्रवेशद्वार, महाविद्यालयाच्या पूर्वेकडील भाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असलेल्या महाविद्यालयाच्या पश्चिमकडील भागात अतिक्रमण केलेल्या झोपड्या पूर्णपणे पाडण्यात आल्या. यापूर्वी कारवाईत या झोपड्यांवरील कारवाई टळली होती.

दरम्यान गुरुवारी सर्व झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. यासाठी अतिक्रमण विभागाचा ताफा सकाळी ६ वाजताच दाखल झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व झोपड्या काढण्यात आल्या. नागरिकांनी आधीच सामान बाहेर काढून ठेवले होते. प्रवर्तन विभागाचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत, विभागाचे अधीक्षक संजय कांबळे, कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा –  देशातील हवामानात मोठा बदल; ‘या’ राज्यांना दिला अतिवृष्टीसह वादळाचा इशारा

महिलांचा विरोध
प्रवर्तन विभागाच्या कारवाईला महिलांनी विरोध केला. दरम्यान जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गड्डीगोदाम चौक परिसरात कारवाई
गड्डीगोदाम चौकातील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात अनधिकृतरित्या उभारलेले ३ ते ४ शेड्सचे बांधकाम जेसीबी आणि पोकलेनने तोडण्यात आले. याशिवाय गांधीबाग झोन अंतर्गत महाल ते इतवारी परिसर या रस्त्यांवरील फूटपाथ व रोडलगत लावलेले अवैध ठेले व दुकाने हटवली. कारवाईत सुमारे एक ट्रक इतके साहित्य जप्त करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button