राहुल गांधींचा जयशंकरांवर पुन्हा हल्ला : “त्यांचे मौन लज्जास्पद”; भाजप म्हणते – हे पाकिस्तानची भाषा
"किती विमाने हरवली? किती नुकसान झाले?" – काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला लष्करी कारवाईबाबत आधीच माहिती देण्यात आल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी विचारले की, “पाकिस्तानला माहिती दिल्यामुळे भारताने किती विमानं गमावली?”
दुसरीकडे, भाजपाने राहुल गांधींवर पलटवार करत त्यांना “पाकिस्तानची भाषा बोलणारा” असा आरोप केला आहे आणि त्यांच्या वक्तव्याला देशाच्या सुरक्षेवर आघात मानले आहे.
“जयशंकरांचे मौन म्हणजे लज्जास्पद” – राहुल गांधी
राहुल गांधींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत जयशंकर यांच्यावर आरोप केला की, “त्यांचे मौन केवळ बोलके नाही, तर लज्जास्पद आहे.” “जर पाकिस्तानला माहिती देऊन हल्ला केला गेला असेल, तर हे राष्ट्रीय सुरक्षेचा घोर अपमान आहे,” असेही राहुल म्हणाले.
“किती विमाने हरवली? किती नुकसान झाले?” – काँग्रेसचा सवाल
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्र्यांना थेट सवाल करत विचारले, “किती अतिरेकी पळून गेले? भारताचे किती नुकसान झाले?”
भाजपाचा पलटवार – “राहुल गांधींचे वक्तव्य पाकिस्तानप्रेमी’
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी, आणि अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. “ते पाकिस्तानच्या प्रचाराचे समर्थन करत आहेत,” असा आरोप करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने राहुल गांधींचे दावे “तथ्यांची विपर्यास” असे सांगून फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला इशारा देण्यात आला, हे वेगळे आणि सुरक्षित प्रक्रियेचा भाग होता.
पार्श्वभूमी : ऑपरेशन सिंदूर काय आहे?
७ मे रोजी भारताने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरच हा वाद निर्माण झाला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“जयशंकरांचे मौन केवळ बोलके नाही, ते लज्जास्पद आहे. पाकिस्तानला आधीच माहिती दिली गेली, त्यामुळे किती विमाने हरवली?” “हे चुकून झाले नाही, ही गुन्हा होता. देशाला सत्य माहीत असायला हवे.”
— राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
“राहुल गांधी सतत देशाच्या लष्कराचा अपमान करत आहेत. MEA आणि IAF ने स्पष्ट सांगितले आहे की कोणतेही नुकसान झाले नाही.”
— प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री