पेट्रोल पंप चालक संघटनांनी UPI आणि इतर डिजिटल पेमेंट स्वीकारणं थांबवण्याचा निर्णय
डिजिटल व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात वाढ

नागपूर : पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी 10 मेपासून UPI आणि इतर डिजिटल पेमेंट स्वीकारणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः विदर्भ व नाशिकमध्ये लागू होणार आहे.
UPI पेमेंटवर बंदी का आणली जात आहे?
पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक वेळा फसवणूक करणारे लोकं इतरांचे कार्ड किंवा नेटबँकिंग वापरून पेमेंट करतात आणि नंतर तक्रार करून तो व्यवहार रद्द करून घेतात. त्यामुळे पंप चालकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.
कोणत्या शहरांमध्ये होणार अंमलबजावणी?
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्स संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्ये संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी सांगितले की, अनेक पंप चालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.
हेही वाचा – गोशाळेतील जनावरांसाठी स्वतःच्या शेतातील चारा
डिजिटल फ्रॉडची वाढती समस्या
या घटनांमुळे अनेक पेट्रोल पंपांचे बँक खातेदेखील ब्लॉक करण्यात आले आहेत. एकदा खाती ब्लॉक झाली की, इतर व्यवहार देखील करता येत नाहीत. यामुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत सापडले आहेत.
सरकारकडे मागणी
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, याबाबत सरकारला माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत सायबर फ्रॉडविरोधात कडक उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत डिजिटल पेमेंट पुन्हा सुरु केले जाणार नाही.