गोशाळेतील जनावरांसाठी स्वतःच्या शेतातील चारा

पिंपरी चिंचवड: उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी जित्राबांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या ओळखून चिखली येथीलदिनेश यादव मित्रपरिवाराने स्वतःच्या शेतातील चारा गोशाळेला उपलब्ध करून दिला आहे.
उन्हाळ्यात चारा टंचाई भासल्याने चिखलीतील माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी शेतातील चारा गोशाळेसाठी उपलब्ध करून दिला. छत्रपती शंभूराजे गोशाळा भोसरी व चंद्रभागा गोशाळा चिखली येथे चारा देऊन गोमातेची पूजा केली. यावेळी किसन आप्पा यादव,लालचंद यादव ,अमित बालघरे, भिमराव साठे,वैभव वाघ,सचिन डिबंर उपस्थित होते.
हेही वाचा – भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सज्ज; ‘वॉर बुक’नुसार सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्री फडणवीस
दिनेश यादव याबाबत म्हणाले, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी गोशाळेसाठी चारा मिळत नाही त्यात हिरवा चारा मिळणे अवघड आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून स्वतःच्या शेतातील हिरवा चारा गोशाळेसाठी देण्यात आला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
भारतीय समाजामध्ये गोमातेचं स्थान मातेसमान आहे. तिची सेवा केल्याने केवळ पुण्यच मिळत नाही, तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि आत्मिक शांती मिळते. आज या कार्याच्या माध्यमातून मी एक संकल्प घेतला आहे, “माझ्या संपूर्ण कार्यकाळात गोसेवा अखंडपणे सुरू ठेवेन, गोसंवर्धनासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्नशील राहीन आणि गोमातेचे रक्षण ही माझी जबाबदारी म्हणून निभावेन.”
– दिनेश यादव,माजी स्वीकृत नगरसेवक