Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

महाराणी ताराराणींबाबत आक्षेपार्ह विधान; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा!

सतिश काळे यांची मागणी : जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

पिंपरी–चिंचवड | इतिहासाच्या संदर्भातील विवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या विधानावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला असून, महाराष्ट्र सरकारकडून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. मुनींच्या विधानानुसार, छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबच्या अमानुष अत्याचारानंतर जैन महाराणी तारादेवींचा उदय झाला आणि त्यांनी मुघल सत्तेला पराभूत केले. संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्ष सतीश काळे यांनी हे विधान भावनिकदृष्ट्या दुखावणारे असल्याचे सांगितले.

काळे म्हणाले, “महाराणी ताराराणी हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. इतिहासात त्यांच्या जैन धर्माशी संबंधित असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा विधानांनी इतिहासाची खरी ओळख चुकीच्या दिशेने वळते आणि समाजात गैरसमज निर्माण होतो.

हेही वाचा      :              ‘आप’मध्ये अंतर्गत राजकारण? खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यास बंदी 

तसेच, महाराणी ताराराणी हे पराक्रमी योद्धा होत्या आणि त्यांच्या कार्याबाबत चुकीची माहिती पसरवणे अन्यायकारक आहे. तसेच जैन धर्माचा संदेश सत्य, अहिंसा आणि शांततेवर आधारित असल्यामुळे अशा विधानांनी समाजात गैरसमज निर्माण होतो.

इतिहासाची खरी ओळख सुस्पष्ट ठेवणे आपले कर्तव्य आहे. महाराणी ताराराणी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील पराक्रमी योद्धा होत्या; त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवणे योग्य नाही. जैन मुनी पद्मसागर यांनी केलेले विधान भावना दुखावणारे आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून तत्काळ जाहीर माफी मागणे आवश्यक आहे.

– सतीश काळे, शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button