ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करणार : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते

नागपूर : भक्कम पायाभूत सुविधांमध्ये आणखी नियोजनबध्द भर टाकून येत्या पाच वर्षांत नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगराचा लौकिक प्राप्त करून देऊ, असा विश्वास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून विकासकामांत नागपूरने मैलाचा टप्पा गाठला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. यासोबतच महाराष्ट्राला देशात आघाडीवर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रशासन काम करत आहे.

विकासाच्या प्रक्रियेत महसूल व गृह विभागाची संयुक्त कार्यक्षमता ही अत्यंत महत्वाची असते. कायदा व सुव्यवस्था, शांतता, परस्पर सहकार्याची भावना यातूनच विकासाला पोषक वातावरण तयार होते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा    :    HSC Result | बारावीच्या रिझल्टची तारीख बदलली, कधी लागणार रिजल्ट? 

महिला सशक्तीकरण, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, स्वयंरोजगार, औद्योगिक क्षेत्र, शहरी पायाभूत विकास, ग्रामीण विकास, सांस्कृतिक-क्रीडा विकास, ऊर्जा, प्रभावी जलनियोजन यासाठी शासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आपण लंडनहून महाराष्ट्रात आणली. राजे रघुजी भोसले यांची तलवार आता महाराष्ट्रात येत आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सर्व काही शासन पूर्ण श्रध्देने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुशासनासाठी प्रशासनात व्यापक बदल

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांकरिता अग्निशमन वाहनांचे वितरण

क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराचे वितरण

जिल्हा माहिती कार्यालयाच्या घडी पत्रिकेचे प्रकाशन

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button