ममता बॅनर्जींनी मतदान केंद्रावरुन थेट राज्यपालांना केला फोन; म्हणाल्या…

नवी दिल्ली |
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु असून दुपारी १ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पाच राज्यांमध्ये निवडणूक असली तरी सर्वांचं लक्ष मात्र पश्चिम बंगालकडे आहेत. त्यातच आज होणाऱ्या मतदानामध्ये खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघाचा समावेश आहे. ममता बॅनर्जींमसोर त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी सुवेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे. मात्र मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं पहायला मिळत आहे.
नंदीग्राम येथील मतदान केंद्रावर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ममता बॅनर्जीदेखील नंदीग्राम येथील मतदान केंद्राबाहेर थांबल्या असून तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गोंधळ घालण्यासाठी बाहेरील लोकांना येथे आणण्यात आल्याचा आरोप केला. त्यांना खासकरुन याच कामासाठी आणण्यात आल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रीय यंत्रणा मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रात प्रवेश करु देत नसल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील मतदान केंद्राबाहेर आंदोलनच सुरु केलं आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट राज्यपालांना फोन केला आणि स्थानिकांना मतदान करु दिलं जात नसल्याची तक्रार केली.
#WATCH| Slogans were raised after West Bengal CM Mamata Banerjee arrived at the polling booth in Nandigram. pic.twitter.com/uhhSzfOknF
— ANI (@ANI) April 1, 2021
वाचा- मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्र बससेवेवरील बंदी ३० एप्रिलपर्यंत वाढवली