ताज्या घडामोडीपुणे

अल्पवयीन दुचाकी चोरटा जाळ्यात

पुणे | वाहन चोऱ्या तसेच मोबाईल चोरणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अन पोलीसांचा थरार लोणी काळभोर परिसरात घडला. मध्यरात्री संशयावरून पोलीसांनी त्याचा पाठलाग केल्यानंतर त्याच्याकडून पोलीसांनी चोरीचे 5 मोबाईल व 2 दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. तो खडकवासला येथील किरकिटवाडी येथे राहतो. मुळचा तो कर्नाटक येथील आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस रात्री गस्त घालत होते.यादरम्यान, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडकी येथील वजन काटा परिसरात त्यांना दुचाकीवर एक मुलगा संशयित दिसला. त्याला थांबिवण्याचा प्रयत्न केला. पण, तो पोलीसांना पाहून पसार झाला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याला पकडले. त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यानुसार, त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, दोन दुचाकी तसेच 5 मोबाईल असा सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, अविनाश जोशी, विनोद कांबळे, महेश भोंगळे, सागर वणवे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button