Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगात पुन्हा भारताचा डंका ; जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

World’s 4th Largest Economy India : भारतासाठी जागतिक स्तरावरून चांगली बातमी समोर आली आहे. जपानला मागे टाकत, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. याविषयीची माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी  दिली आहे. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या १० व्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, जागतिक आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल आहे.

बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी याविषयी बोलताना, “आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आज आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत.” असे म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीचा हवाला देत ते पुढे म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्था आता जपानपेक्षा मोठी झाली आहे. भारताने हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत. मला आशा आहे की आपण लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू.”अशीदेखील माहिती दिली.

हेही वाचा – नांदेडमध्ये भाजपचा ‘शंखनाद’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

नीती आयोगाचे सीईओ यांनी पुढे, “आम्ही आमच्या योजनेवर ठाम आहोत आणि जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आम्ही जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू” असे म्हटले. पुढे ते म्हणाले की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगात अशांतता असताना भारताने हे स्थान मिळवले आहे, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील भारताच्या वाढीला रोखू शकलेले नाहीत.”

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अ‍ॅपल आयफोनवर कर लादण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले, “आम्हाला आशा आहे की अमेरिकेत विकले जाणारे अ‍ॅपल आयफोन भारतात किंवा इतर कुठेही नव्हे तर अमेरिकेतच तयार केले जातील. भविष्यातील कर काय असतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. तथापि, आम्ही निश्चितच उत्पादनासाठी स्वस्त ठिकाण असू.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button