दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

Deepak Kesarkar : माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी एका सभेमध्ये राजकीय निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. ते विधान गमतीने केल्याचे म्हणत त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
याआधी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदं न मिळाल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. “मी नाराज नाही मागील अडीच वर्षे मी मंत्रीपदी होतो त्यात मी खुश आहे. मला काम करण्यासाठी आमदारकी पुरेशी आहे. इतरांनाही संधी मिळायला हवी आता माझ वय वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात कोणीतरी उठून बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल चांगलं आहे,” अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली होती.
हेही वाचा – जगात पुन्हा भारताचा डंका ; जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
मात्र आता त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “ते वक्तव्य मी गमतीने केले होते. पुढील काळात आमदारकी नाही पण राज्यसभा किंवा विधान परिषदेची निवडणूक लढण्याची आपल्या ताकद आहे. नवीन युवकांना संधी देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे,” असे म्हणत राजकीय निवृत्तीच्या निर्णयावरून यांनी यूटर्न घेतला आहे. तसेच, आगामी काळात सावंतवाडी मतदारसंघातून नवीन चेहरा देऊ मात्र विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या माध्यमातून सक्रिय राहू असे त्यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर देखील केसरकर यांनी भाष्य केले आहे. “उबाठाची 60 ते 70 टक्के मत ही फतव्यातून येतात. ते जर राज ठाकरेंना मान्य असेल तर त्यावर आम्ही काय बोलावं. बाळासाहेबांनी कधी काँग्रेस सोबत तडजोड केली नाही. पहिलं काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात आणा आणि मग दोघे एकत्र आले तर सगळ्यांना आनंद होईल. आज काँग्रेससोबत एकत्र येऊन उबाठा आपल्या मूळ विचारसरणीपासून दूर गेली आहे,” असे दिपक केसरकरांनी म्हंटले आहे.