बुलढाणा जिल्ह्यात बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात बस चक्काचूर ,तीन महिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू

पुणे : राज्यात मंगळवारी दोन भीषण अपघात आले. बुलढाणा जिल्ह्यात बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात सांगली – मिरज पंढरपूर कोची फाट्याजवळ झाला. ट्रक टेम्पोच्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणाऱ्या 18 चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.
मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची आमसरी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खामगाव ते नांदुरा महामार्गावर भीषण अपघात बसमधील 10 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. जखमींना खामगावच्या सामान्य रूग्णालय हलविले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु केले आहे.
हेही वाचा – प्रवाशांना वातानूकुलीत पर्यटनाची संधी, पीएमपीकडून उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांसाठी खास बससेवा
पंढरपूर महामार्गावरील अपघातात तीन ठार
मिरज तालुक्यातील म्हैशाळ येथील महिला द्राक्षबाग तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील खेरडी गावांमध्ये गेले होते. ते रात्री परतताना कवठेमंकाळ पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणाऱ्या 18 चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात तीन महिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर आठ महिला आणि चालक जखमी झाले आहेत.
अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये यात भारती कांबळे, रेखा कांबळे, राणी वडर, या महिलांचा समावेश आहे. अपघातात ट्रकची धडक इतकी जोराची होती की धडकेत टेम्पो पलटी होऊन काही महिला टेम्पोतून बाहेर फेकल्या गेल्याचे गेल्या होत्या. घटनास्थळाहून ट्रक चालकाने पळ काढला आहे. याबाबत कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला मिरज तालुक्यातील म्हेशाळ या गावातील आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.