धुमधडाक्यात पार पडला सिद्धार्थ-मितालीचा संगीत सोहळा
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आता लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. चाहत्यांमध्येही त्यांच्या लग्नाबाबत प्रचंड उत्सुकता असून सिद्धार्थ-मितालीने सोशल मीडियावर हळद, मेहंदी असे सर्व सोहळ्यांचे फोटो शेअर करत चाहत्यांना त्यांच्या आनंदाच्या क्षणांचे साक्षीदार केले आहे. नुकताच या दोघांचा संगीत सोहळा दणक्यात पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाचा :-लग्नासाठी अलिबागला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात
काही दिवसांपूर्वीच मिताली आणि सिद्धार्थने त्यांच्या हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. त्यानंतर आता त्यांचा संगीत सोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ-मितालीच्या काही मित्र-मैत्रिणींनी या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर यापूर्वी सिद्धार्थ-मितालीने त्यांचे केळवण, ग्रहमख, हळद, मेहंदी या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर ही जोडी येत्या काही दिवसांत लग्नबंधनात बांधली जाणार आहे.
https://www.instagram.com/p/CKVvrCnpN66/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/CKVvck-JxN6/?utm_source=ig_embed





