निफ्टी बँक आणि शेअर बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचे बळ
शेअर बाजारात तुफान, सेन्सेक्सची 1600 अंकांची झेप, या स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल

पुणे : शेअर बाजारात शुक्रवारनंतर मंगळवारी मोठे तुफान आले. भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आज 1588 अंक वधारला. सेन्सेक्स 76,745.51 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टीमध्ये 471 अंकांची उसळी दिसून आली. निफ्टी 23,300.40 अंकावर व्यापार करत होता. निफ्टी बँकमध्ये सुद्धा जोरदार तेजी दिसून आली. हा निर्देशांक 1127 अंकांनी वधारून 52,130 अंकावर व्यापार करत आहे.
हेही वाचा – प्रवाशांना वातानूकुलीत पर्यटनाची संधी, पीएमपीकडून उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांसाठी खास बससेवा
निफ्टी बँक आणि शेअर बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचे बळ मिळाले आहे. अनेक मोठ्या शेअरमध्ये मोठी उलाढाल दिसून आली. HDFC Bank च्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. तर ICICI बँकेचा शेअर 2.87 टक्क्यांनी वधारला. याशिवाय BSE टॉप 30 शेअरमधील 28 शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. नेस्ले आणि ITC स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. Tata Motors च्या शेअरमध्ये 5.28 टक्क्यांची तेजी दिसली. तर L&T आणि महिंद्रा आणि महिंद्राच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांच्या जवळपास तेजी दिसून आली.