दुचाकीस्वारांसाठी मोठी बातमी! दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार अशी माहिती समोर आल्यानंतर देशासह राज्यभरात चर्चेला उधाण आलं. दरम्यान, केंद्रीय वाहतून मंत्री नितीन गडकरी यांनी ही केवळ अफवा असून दुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही असे स्पष्टीकरण दिलं आहे.
एनएचएआयच्या नवीन तरतुदींनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल कर भरावा लागेल. टोल भरण्याचे टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा फास्टॅग न वापरणाऱ्या दुचाकीस्वारकडून २ हजारांचा दंड आकारला जाईल, काही माहिती समोर आली होती. यावर नितीन गडकरी यांनी ट्विट करत नेमकं खरं काय आहे? याचा खुलासा केला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र एकवटणार…! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव
“काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो.” अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.