Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सरोद वादक व रेखाचित्रकार ‘गिरीष चरवड’ यांच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

पुणे : प्रसिध्द सरोद वादक व रेखाचित्रकार गिरीष अनंत चरवड यांचे टपाल तिकीट. महानव्यक्ती कींवा महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या व्यक्तींचे फोटो टपाल तिकीटावर छापण्यासाठी भारत सरकारची जुनी योजना आहे.

याच योजनेअंतर्गत सुप्रसिध्द सरोद वादक व रेखाचित्रकार गिरीश अनंत चरवड यांनी वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने भारत सरकारच्या या टपाल तिकीट योजनेनुसार पुण्याचे वारली चित्रकार समीर धर्माधिकारी यांनी त्यांचे टपाल तिकीट तयार करून एक आगळी वेगळी भेट सादर केली.

हेही वाचा –  “उज्ज्वलजी मराठीत बोलू की हिंदीत?”, उज्ज्वल निकम यांनी सांगितला मोदींच्या फोनचा किस्सा

सदर टपाल तिकीट हे पुण्याचे सिटी पोस्ट या मुख्य पोस्ट आॅफीसच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने व सहकार्याने, “माय स्टॅम्प” यावर आधारीत आहे. विशेष म्हणजे ईतर टपाल तिकीटांप्रमाणेच देशात कोठेही हे टपाल तिकीट वापरून पत्र पाठविता येते. यावेळी पुणे सिटी पोस्ट मुख्य कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्टर विजय घुले साहेब उप पोस्ट मास्टर संदिप ढवळे उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button