Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

आयकर विभागाची मोठी कारवाई, १५० कोटींची रोकड जप्त

Income Tax Raid : ओडिशा आणि झारखंडमधील एका मद्य उत्पादक कंपनीवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. या छाप्यात मिळालेली रक्कम पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. अधिकाऱ्यांना ट्रकमधून पैसे न्यावे लागले. अधिकारी, कर्मचारीच नाहीतर छाप्यातील रक्कम मोजता मोजता मशीनसुद्धा खराब झाले.

आयकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली. ओडिशामधील बोलांगीर आणि संबलपूर तसेच झारखंडमधील रांची, लोहरदगामध्ये आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात बुधवारी ५० कोटी रुपये मोजण्यात आले. त्यानंतर मशीनच खराब झाले. या छाप्यानंतर दोन व्यापारी फरार झाले.

हेही वाचा  –  ‘२०२४ च्या निवडणुकीपुर्वी POK ताब्यात घेऊन दाखवा, संपूर्ण देश भाजपाला मतदान करेल’; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) ही कंपनी मद्य बनवणारी आहे. ही कंपनी रामचंद्र रूंगटा यांची आहे. बुधवारी या कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही ही छापेमारी कायम होती. आयकर विभागाने ओडिशामधील कार्यालयात टाकलेल्या छाप्यात १५० कोटी रुपये जप्त केले. बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहयोगी कंपनी बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या कार्यालयातून हे पैसे जप्त करण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button