पीएमपीएल कर्मचाऱ्यांना तातडीने मूळ डेपोवर रुजू करावे
भाजपचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड : पीएमटी आणि पीसीएमटी एकत्रीकरणानंतर पीएमपीएल बस डेपोतील अनेक कर्मचारी तात्पुरते पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनात रुजू करण्यात आले होते. मात्र, सध्या महापालिकेतील कामकाजासाठी महापालिकेचेच कर्मचारी पुरेशा संख्येत उपलब्ध असल्याने, हे कर्मचारी तातडीने पुन्हा मूळ पीएमपीएल डेपोवर पाठवावेत, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
काळभोर यांनी म्हटले की, महापालिकेच्या आठ प्रभागांत कार्यरत असलेले अनेक पीएमपीएल कर्मचारी तांत्रिक ज्ञान नसल्याने केवळ मजूर पदावर होते. मात्र, सध्या ते फक्त हजेरी लावून दिवस घालवत आहेत. दुसरीकडे पीएमपीएल डेपोमध्ये खाजगी कंत्राटदारांकडून मनुष्यबळ पुरवले जात आहे, तर मूळ हक्काचे कर्मचारी महापालिकेत निष्क्रिय आहेत.
हेही वाचा : अरबी समुद्रात लष्करी हालचाली वाढल्या : भारत-पाकचा मोठा निर्णय : काहीतरी भयंकर घडत आहे?
काही कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशांवर राजकीय दबावामुळे अंमलबजावणी न झाल्याचाही आरोप काळभोर यांनी केला. त्यामुळे, महापालिकेत रुजू असलेले सर्व पीएमपीएल कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ खात्यात पाठवावेत आणि त्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने महापालिकेला लेखी मागणी करावी, असा पुनरुच्चार त्यांनी केला.





