भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव पंधरवडा साजरा
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा 'आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा' जाहीर
राष्ट्रीय : आदिवासी व्यवहार मंत्रालयाने ‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’ची घोषणा केली असून तो १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम ‘आदिवासी गौरव वर्ष’ चे भव्य समापन आणि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा केला जाणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने साजरा केला जाणार आहे.
हा दोन आठवड्यांच्या उत्सव देशभरात आदिवासी संशोधन संस्था (TRIs), एकलव्य मॉडेल निवासी विद्यालये (EMRSs),ट्रायफेड(TRIFED), आणि एनएसटीएफडीसी (NSTFDC) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आयोजित केला जणार आहे . याचा उद्देश्य भारताच्या आदिवासी समुदायांचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांच्या योगदानांच्या स्मृतींची उजळणी केली जाणार आहे.
‘आदिवासी गौरव वर्ष पंधरवडा’चा उद्देश्यामागे प्रमुख पावले उदा.पीएम जनमन (PM JANMAN), आदि कर्मयोगी अभियान, राष्ट्रीय सिकल सेल उन्मूलन मिशन, दाजगुआ (DAJGUA), आणि विभिन्न उपजीविका आणि उद्योजकता कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या प्रगती आणि यशांचा उत्सव साजरा करणे.
हेही वाचा : पिंपळे सौदागरमध्ये रंगणार आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप स्पर्धा
आदिवासी गौरव दिवस २०२५ च्या दिशेने अग्रसर या पंधरवड्या दरम्याने देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आदिवासी संस्कृती, वारसा आणि उपलब्धींना प्रदर्शित करणाऱ्या विविध आयोजनांची श्रृंखला आयोजित करत आहेत. यात मणिपूरात Tribal Frames Film Festival, छत्तीसगढमध्ये शहीद वीर नारायण सिंह लोक कला महोत्सव, अंदमान तसेच निकोबार द्वीरसमुहात आदिवासी मेळे, गुजरातमध्ये आदिवासी गौरव यात्रा, उत्तराखंडात आदि खेल दिवस आणि गोव्यात महासंमेलन सारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. हे सर्व आयोजन ‘आदिवासी गौरव वर्ष’च्या भावनेला साकार करताना भगवान बिरसा मुंडा यांच्या अमरवारशाला समर्पित असणार आहे.
या पंधरवड्यात सांस्कृतिक महोत्सव, प्रदर्शने, युवा सहभाग कार्यक्रम आणि जागरूकता मोहिमा आयोजित केल्या जातील, ज्यांचा समारोप १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आदिवासी गौरव दिनाने होणार आहे. या दिवशी, संपूर्ण देश भगवान बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहेल, ज्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारताच्या आदिवासी स्वातंत्र्य चळवळीला चेतवले आणि पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की त्यांनी ‘भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्ताने आदिवासी सशक्तीकरणाच्या ११ वर्षांचा उत्सव’च्या भावनासह आयोजनात सहभागी व्हावे. या निमित्ताने आपल्या आदिवासी नायकांना नमन करणे आणि समावेशी तसेच सतत विकासाच्या प्रती राष्ट्राच्या प्रतिबद्धतेला पुन:सुदृढ करण्याचे प्रतिक आहे.




