पिंपरी-चिंचवड: २००० कोटींच्या अवैध खनिज घोटाळ्यात सरकारचा ‘‘कानाडोळा’’
उपोषण चार तारखेपर्यंत स्थगित : शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट

शिरूर: अवैध गौण खनिज उत्खननातील २००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सरकारने डोळे मिटले आहेत, अशी गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप पाच दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. उपोषण स्थळी आज शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.
अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की, “सरकारकडे कंत्राटदार आणि लाडक्या बहिणींचे पैसे द्यायला पैसा नाही, पण दोन हजार कोटींचा अवैध खनिज घोटाळा घडतोय याकडे सरकार कानाडोळा करत आहे. मी कलेक्टरांशी प्रत्यक्ष भेटून दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडणार आहे.”
हेही वाचा – “Run For Unity” : एकतेच्या उत्सवात पिंपरी-चिंचवडकरांचा उत्साही सहभाग!

विशेषतः तीन तारखेपर्यंत योग्य तो मार्ग निघाला नाही तर जास्त मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा खासदार कोल्हे यांनी दिला. त्यांनी उपोषण स्थळी काशिनाथ जगताप यांना ज्यूस पाजून उपोषण चार तारखेपर्यंत स्थगित ठेवले.
यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते ज्यात अध्यक्ष तुषार कामठे, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रदेश संघटक संदीप चव्हाण, विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अनिल भोसले, विनोद धुमाळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, गणेश भांडवलकर, रुपाली भडाळे, नितीन मोरे, संतोष माळी, योगेश सोनवणे, तुषार गाडे, ॲड. दिलीप शिंगोटे, ॲड. रवींद्रकुमार भडाळे, लोभस साखरे, साळवे सर आदी उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“सरकारकडे कंत्राटदारांचे पैसे नाहीत, पण २००० कोटींचा अवैध खनिज घोटाळा चालतोय. दोषींवर कारवाई होईपर्यंत मी, काशिनाथ जगताप आणि जनतेसाठी लढा थांबवणार नाही!”
– अमोल कोल्हे, खासदार, शिरुर, पुणे.




