आंतरराष्ट्रीयटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून पीएफ काढण्याची सुविधा

केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी याविषयीचे सरकारचे धोरण जाहीर

आंतरराष्ट्रीय : आता पीएफ काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. येत्या ऑगस्टपर्यंत तर अनेकांना सहज एटीएममधून अथवा युपीआयच्या माध्यमातून त्यांची पीएफ रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे. या नवीन डिजिटल अद्ययावत प्रक्रियेला केंद्र सरकारने EPFO 3.0 असे नाव दिले आहे. एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल. पीएफची रक्कम थेट एटीएममध्ये जमा होईल. केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी याविषयीचे सरकारचे धोरण जाहीर केले आहे. याविषयीचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काय आहे केंद्रीय मंत्र्यांचा दावा?

ईपीएफओ सदस्यांना एटीएम कार्ड

केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO 3.0 चे लॉचिंग लवकरच होत आहे. ईपीएफओ सदस्यांना लवकरच पीएफ काढण्यासाठी ATM Card देण्यात येतील. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात बदलास सुरुवात करण्यात आली आहे. ईपीएफओच्या वेबसाईट आणि सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात येत आहे. खातेदारांना युपीआय Paytm, GPay, PhonePe ॲपवरून पीएफ रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत करता येईल. एटीएममधून ही रक्कम काढता येईल.

हेही वाचा –  कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

UPI इंटिग्रेशन योजना

EPFO ने युपीआय इंटिग्रेशन ही योजना तयार केली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातून सदस्यांना रक्कम काढण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे पीएफ काढण्यासाठी सध्या जो कालावधी लागतो. तो अगदी काही मिनिटांवर येणार आहे. युपीआय ॲपमध्ये ‘EPFO Withdrawal’ हा पर्याय लवकरच मिळेल. त्याआधारे पीएफ रक्कम काढता येईल.

किती रक्कम काढता येईल?

EPFO सदस्याला त्याच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेतील 50 टक्के रक्कम ATM आणि UPI App च्या माध्यमातून काढता येईल. पीएफ खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढण्याची ही सुविधा मे ते जून 2025 या दरम्यान देण्यात येऊ शकते. बँकेच्या धरतीवर होत असलेले या बदलाचा फायदा लवकरच कर्मचारी, सदस्यांना मिळेल, अशी आशा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button