जेएनयू हल्ल्याच्या चौकशीसाठी विद्यापीठाची ५ सदस्यीय समिती

नवी दिल्ली | महाईन्यूज
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत उपाय सुचवण्यासाठी विद्यापीठाने पाच सदस्यांची एक समिती स्थापन केलेली आहे, असे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी गुरुवारी सांगितलेले आहे. सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या की काय, याचीही समिती चौकशी करणार आहे.
आम्ही पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून ती आमच्या अंतर्गत सुरक्षा समितीसोबत काम करेल. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्यास त्याचीही चौकशी करून, विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही समिती उपाय सुचवेल, असे कुमार म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने कमजोर असलेले विभाग ओळखणे, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह इतर उपाययोजना करणे याकडेही समिती लक्ष देणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले आहे.





