breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनपा स्थायी समिती सभापतिपदी कुमार वाकळे बिनविरोध

नगर |

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे आज, गुरुवारी स्पष्ट झाले. या पदासाठी वाकळे यांचा एकमेव अर्ज मुदतीत दाखल झाला. वाकळे यांच्या निवडीची औपचारिकता उद्या, शुक्रवारी आयोजित केलेल्या सभेत पूर्ण केली जाईल. महापालिकेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापौरपद शिवसेनेकडे तर स्थायी समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीला देण्याची तडजोड झालेली आहे. कुमार वाकळे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रवादीचेच अविनाश घुले यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. सभापती पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आज दुपारी दीडपर्यंत होती. या मुदतीत कुमार वाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

वाकळे यांनी तीन अर्ज दाखल केले. त्यावर अनुमोदक म्हणून विनित पाऊलबुधे (राष्ट्रवादी), शेख मुदस्सर (बसप), गणेश कवडे (शिवसेना) यांचे तर सूचक म्हणून मीना चव्हाण (राष्ट्रवादी), मंगल लोखंडे (शिवसेना) व सचिन शिंदे (शिवसेना) यांच्या सह्या आहेत. उमेदवारी दाखल करताना महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले तसेच दोन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. शिवसेना व काँग्रेसने बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केल्याबद्दल गटनेते संपत बारस्कर यांनी धन्यवाद दिले. सभापती पदासाठी उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत उमेदवारी अर्जाची छाननी होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button