पिंपरी / चिंचवड

रस्त्यावर उभा राहून वेश्याव्यवसायासाठी अश्लील हावभाव करणा-या पाच महिलांवर गुन्हे दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

वेश्याव्यवसाय प्रकरणी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (दि. 17) दुपारी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या कारवाईमध्ये संजय राजेंद्र एडके (वय 36, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सुरज परखंदे (वय 36, रा. साडेसतरानळी हडपसर), सारिका रामेश्वर भोसले (वय 23, रा. अक्षयनगर भोसरी), मनीषा संतोष चौधरी (वय 32, रा. चिखली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपी महिला पुणे आळंदी रोडवर मॅक्झिन चौक येथे फिर्यादी आणि इतरांना अश्लील हावभाव करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल, त्रास होईल असे वर्तन करत होत्या. तसेच त्यांनी सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये संतोष प्रल्हाद मुसळे (वय 22, रा. इंद्रायणीनगर, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंजू अकबर मोडल (वय 32, रा. बुधवारपेठ, पुणे), लाजो अबुल कासिम मिर शेख (वय 31, रा. बुधवार पेठ, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी देहूफाटा आळंदी येथे दुचाकीवरून जात होते. आळंदी चाकण रस्त्यावरती वाय जंक्शनच्या पुढे आरोपी महिलांनी फिर्यादी आणि इतरांना लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल व त्रास होईल असे वर्तन केले. तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी कृती केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button