ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसातारा

किसन वीर-खंडाळा कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणारच: आमदार मकरंदआबा पाटील ; बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ उत्साहात

२०२३ २४ च्या गळीत हंगामाकरिता लागणारी तोडणी यंत्रणेचे करार पुर्ण

भुईंज : किसन वीर व किसन वीर खंडाळा कारखान्याची मागील हंगामातील एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे तसेच व्यापारी देणी व इतर सर्व देणी भागविल्यामुळे दोन्ही कारखान्यांची गेलेली विश्वासर्हता परत मिळविण्यास आमचे व्यवस्थापन यशस्वी ठरलेले आहे. सन २०२३ २४ च्या गळीत हंगामाकरिता लागणारी तोडणी यंत्रणेचे करार पुर्ण झालेले असुन त्यांना त्यांचे हप्तेही दिलेले आहेत. त्यामुळे किसन वीर-खंडाळा कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार असल्याचा विश्वास किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला.

म्हावशी, ता. खंडाळा येथील किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या सन २०२३-२४ च्या गळित हंगामाचा बॉयलरचे विधिवत पुजन कार्यक्षेत्रातील सभासद शेतकरी उत्तम गोविंद पवार व सौ. विमल उत्तम पवार (बावडा), अमोल धनाजी भोसले व सौ. अश्विनी अमोल भोसले (शिवाजीनगर), बयाजी आबुजी माळी व सौ. पुतळाबाई बयाजी माळी (म्हावशी), हनुमंत नथुराम पाटील व सौ. मनिषा पाटील (जवळे) व प्रविण धनसिंग संकपाळ व सौ. उज्वला प्रविण संकपाळ (खंडाळा) या उभयतांच्या हस्ते होऊन किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नि प्रदिपन संपन्न झाले. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, उदय कबुले, नितीन भुरगडे-पाटील, ज्ञानदिप सोसायटीचे चेअरमन जिजाबा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मकरंद आबा पाटील पुढे म्हणाले की, किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या मागील व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे कारखान्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला, हे आपणांस माहित आहेच. कदाचित या दोन्ही कारखान्यांचे लिलावही झाले असते. परंतु तुमच्या सर्वांच्या साथीने व विश्वासाने मागील हंगाम आपण सुरू करू शकलो. त्यावेळीही विरोधकांनाही वाटत होते की, कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत. परंतु आपण सुरू केले, सर्व देणीही दिली. आमच्या व्यवस्थापनाचा हा पहिला हंगाम असल्याने काही अडचणींना सामोरे जावे लागले परंतु त्यातुन आम्हाला अनुभव आला. मागील हंगामात ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या. त्या चालू हंगामात येणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांची मिळुन जवळपास बारा ते साडेबारा हजार मेट्रिक टन ऊस प्रतिदिन कारखान्यावर येईल अशापद्धतीची तोडणी यंत्रणेचे आपण करार केलेले आहेत. कारखान्यावरील मागील देणी भागविण्यासाठी व त्यातुन मार्ग काढण्यासाठीच राजकीय भुमिकाही आपण बदलेली आहे. यातून मार्ग लवकरच निघणार असून लवकरच आपण यातून बाहेर पडू असा विश्वासही त्यांनी दिला. येणाऱ्या काळामध्ये आपणही इतर कारखान्यांप्रमाणे दर देण्यात मागे पडणार नाही याची खात्री देऊन शेतकऱ्यांही ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की आमचे व्यवस्थापन कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन मार्ग काढीत असताना यातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून यासाठी आपण आपला परिपक्व झालेला संपुर्ण ऊस कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी दिला पाहिजे, असे आवाहनही यावेळी श्री. पाटील यांनी केले.

बॉयलरचे पुजन करण्यासाठी बसलेल्या उभयतांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक डी. एम. भोसले यांनी मानले. कार्यक्रमास किसन वीरचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, दत्तात्रय ढमाळ, अशोक गाढवे, नितीन भुरगुडे-पाटील, विष्णु तळेकर, किसन धायगुडे, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, हणमंतराव साळुंखे, धनाजी अहिरेकर, किसन ननावरे, शिवाजी शेळके-पाटील, गजानन धुमाळ, रत्नकांत भोसले, सुरेश रासकर, विठ्ठल धायगुडे, सौ. शोभा नेवसे, सौ. शालिनी पवार, एस. वाय. पवार, बाळासाहेब गाढवे, सुधीर सोनावणे, जावेद पठाण, खंडाळच्या नगरसेविका मोनिका मोरे, हेमलता ठोंबरे, भाऊसो गाढवे, शशिकांत पवार, भानुदास यादव, रामदास तळेकर, राहुल बधे, चंद्रकांत मगर, राजेंद्र भोसले, प्रशांत भोसले, अॅड. गजेंद्र मुसळे, मनीष भंडारे, सुधीर यादव, राजेंद्र सोनावणे, नारायण नलवडे, सुजितसिंह जाधवराव, गिरीश कऱ्हाडे, नितीन निकम, अजय भोसले, प्रतिक बाबर,राम पोळ, विकास बाबर, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, बिगर सभासद, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button