breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणव्यापार

महापालिकेतील बिल्डर मारहाण प्रकरण : आमदार महेश लांडगे यांनी मागितली पिंपरी-चिंचवडमधील पटेल समाजाची माफी!

शहरातील पटेल बांधवांच्या समुदायाने घेतली भेट : पटेल-बोऱ्हाडे वादावार तोडगा काढण्याची मागणी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आवारातच उद्योजक नरेश पटेल यांना मारहाण झाली. त्यामुळे पटेल समाजाचे खच्चीकरण झाले, अशी भावना पटेल समाजाची आहे. आम्ही चुकीच्या गोष्टीचे कधीही समर्थन करणार नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत. मी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांच्या कृत्याबद्दल पिंपरी-चिंचवडचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची माफी मागतो. या पुढील काळात उद्योजक, व्यावसायिक आणि भूमिपूत्र यांच्यात वादाचा प्रसंग होणार नाही. हातात हात घालून आपण शहराचा विकास करू, असे आवाहन भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे यांनी जमीन व्यवहारातील वादातून उद्योजक नरेश पटेल यांना महापालिका आवारातच मारहाण केली होती. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. नितीन बोऱ्हाडे हे आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे पटेल समाजाचे थेट आमदार लांडगे यांना साकडे घातले.

दरम्यान, बांधकाम व्यवसायिक नरेश पटेल यांच्यासारख्या वादाच्या घटना पुन्हा घडू नयेत. या करिता शहरातील पटेल समाजाने आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर नवरात्रोत्सव सुरू आहे. त्या ठिकाणी महाआरतीनंतर पटेल समाजाच्या समुहाने लांडगे यांच्यासोबत या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. सुमारे दीड हजार समाज बांधवांसमोर आमदार लांडगे यांनी पटेल समाजाची माफी मागितली. तसेच, चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, अशी ग्वाही दिली.

यावेळी ‘‘आम्ही गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या शहरात व्यवसाय करीत आहोत. २० वर्षे आम्ही आपल्याला पाहतो. या पूर्वी असा कधीही प्रकार घडला नाही. शहरात आम्ही तुमच्या भरोशाने व्यावसाय करीत आहोत. त्यामुळे या प्रकरणात तोडगा काढावा…’’ असे साकडे पटेल समाजाकडून घालण्यात आले.
पटेल समाजाचे दिलीप पटेल म्हणाले की, ‘‘यह पटेल समाज आप के साथ रहा है। हम सब मिलजुल कर काम कर रहें है। पटेल परिवार शांती से रहेता है। महेशदादा आपको इस विवाद में समझोता करना होगा। यावर आमदार लांडगे यांनी माफी मागताच ‘‘दादा आप क्यों माफी मांग रहे हो। हम आप के भरोसे है। आप को माफी मांगने की जरुरत नहीं। अशा शब्दांत पटेल बांधवांनी भावना व्यक्त केल्या.

सामोपचाराने वाद मिटवणार : आमदार लांडगे

आमदार लांडगे म्हणाले की, गैरसमाजातून किंवा व्यवसायिक वादातून असा प्रकार घडला असेल. नितीन बोऱ्हाडे माझा सहकारी आहे. नरेश पटेल यांच्याबाबत झालेली कृती चुकीची होती. याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पटेल समाजबांधवांची दिलगिरी व्यक्त करतो. याबाबत नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांची आगामी दोन-तीन दिवसांत एकत्रित बैठक घेवून आणि सामोपचाराने वाद मिटवण्यात येईल. यापुढील काळात असा प्रकार होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button